टाकळी हाजी : राज्यात भिमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचे हित जोपासते म्हणून कारखान्याचा नावलौकीक आहे. कुकडी प्रकल्पावर आधारीत पुणे, सोलापूर व नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये देखील भविष्यात पाण्यावरून संघर्ष होऊ नये. यासाठी कारखान्याने पुढाकार घेऊन कुकडी कालव्यावर शिर्ष विमोचक ( आऊटलेट ) चे बांधकाम करून पाण्याची उपलब्धता केली आहे. यावर्षी धरणात पाणी साठा कमी आहे. सध्यातरी 40 दिवसाचे एकच आवर्तन सोडणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करावा. असे आवाहन राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी केले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.